१३ फेब्रुवारी पर्यंत पुलावर प्रवेश बंद
ठाणे: बहुचर्चित कोपरी रेल्वेपुलाच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार ‘एमएमआरडीए’मार्फत कोपरी पूर्वेकडे जाणार्या रेल्वे पुलानजीक ‘रिटनिंग वॉल फाऊंडेशन’चे काम ‘एमएमआरडीए’कडून शनिवार दि. ३० जानेवारीपासून हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे दि. ३० जानेवारी ते दि.१३ फेब्रुवारी या कालावधीत जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या कालावधीत कोपरी पूर्वेकडून कोपरी सर्कलमार्गे जुन्या कोपरी पुलाने ठाणे पश्चिमेकडे जाण्यास कोपरी रेल्वेपुलावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहने जुन्या कोपरी पुलाच्या बाजूस असलेल्या कोपरी सर्कलकडे जाणार्या नवीन पुलावरून इच्छितस्थळी जातील. दरम्यान, मुंबईकडून येणार्या वाहनांकरिता ‘हरिओम नगर’ येथील ‘कट’ या कालावधीत बंद ठेवला जाणार असल्याचे वाहतूक उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी अधिसूचनेद्वारे कळवले आहे.