पंतप्रधान मोदींच्या वैयक्तिक वेबसाइटचं ट्विटर अकाऊंट हॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Sep-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक वेबसाइटचे ट्विटर अकाउंट काही काळासाठी हॅक करण्यात आले होते. हे खाते त्यांच्या वैयक्तिक वेबसाइटशी जोडलेले होते. खाते हॅक केल्यानंतर हॅकर्सनी बिटकॉइनची मागणी करण्यास सुरुवात केली. हॅकर्सनी ट्विट करून पीएम नॅशनल रिलीफ फंडामध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी मागितली. मात्र, तत्काळ हे ट्विट्स डिलीट करण्यात आले. काही काळानंतर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले.

आणखी एका ट्विटमध्ये हॅकरने लिहिले की, 'अकाउंट जॉन विक ([email protected]) याने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम हॅक केलेले नाही.' मात्र, आता ही ट्विट डिलीट करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिगत बेवसाइटचे एक ट्विटर अकाउंट आहे. या अकाउंटवर २५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक बेवसाइटचे एक अकाउंट अनेक ट्विट्ससह हॅक करण्यात आले असे ट्विटरने देखील गुरुवारी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची माहिती आपल्याला असून त्यांचे अकाउंटच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले आहे. आम्ही या प्रकरणाची तपासणी करत असून या वेळी आम्हाला त्यांच्या इतर अकाउंटही हॅक झालेत किंवा कसे, याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही, असे ट्विटरच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे
@@AUTHORINFO_V1@@