'सामना वृत्तपत्रातील 'रोखठोक'साठी माझे प्रस्ताव...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

chandrakantdada patil_1&n



मुंबई :
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या निर्णयांमुळे महाविकासआघाडीमधील धुसफूस व नाराजीनाट्य रंगलेले दिसले.त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने यावर बोट ठेवत राज्यसरकारमधील समन्वयाच्या अभावाकडे लक्ष वेधले. अशातच शिवसेनेचे नेते संजय राऊत मात्र सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील 'रोखठोक' मधून विरोधीपक्ष भाजपवर वारंवार टीका करत आहेत. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी 'सामना वृत्तपत्रातील या आठवड्यातील 'रोखठोक'साठी माझे प्रस्ताव...' असे म्हणत संजय राऊतांवर पलटवार केला आहे.


चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढील प्रस्ताव मांडत त्यांनी संजय राऊत यांना प्रस्तावित विषयांवर पुढील एक आठवडा सामना वृत्तपत्रातील रोखठोकमधून लिहिण्याचे खुले आव्हानच दिले आहे.
 

नंबर १ - "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली. ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे. तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द...मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे."


नंबर २ - "पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला...सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते..पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत... मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही...हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे."


नंबर ३. "ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे... यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही...मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे...दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत...हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे."


नंबर ४ : "राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले,अजूनही अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत...खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही...हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे."


दरम्यानच्या कोरोनाकाळात अनलॉक करताना झालेल्या निर्णयांवरून महाविकासआघाडीतील नाराजीनाट्य चांगलेच रंगले. मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेताच राज्यातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे अनलॉक करताना देखील मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी यांच्यातील काही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे नाराज असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. त्यामुळे हीच का ठाकरे सरकारमधली पारदर्शकता असा सवाल विरोधीपक्ष भाजपने उपस्थित केला.
@@AUTHORINFO_V1@@