अयोध्या श्रीराम मंदिराचे बांधकाम तीन-साडेतीन वर्षांमध्ये पूर्ण होणार !

    18-Jul-2020
Total Views | 67

ayodhya_1  H x



नवी दिल्ली :
अयोध्या श्रीराम मंदिराच्या निर्मिती संदर्भात आज श्रीराममंदिर निर्माण ट्रस्टची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली.याबैठकीत भूमिपूजनासाठी दोन तारखांचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं, अशी इच्छा श्रीराम जन्मभूमी न्यासने व्यक्त केली होती. या बैठकीला श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्यासह ट्रस्टचे १२ सदस्य उपस्थित होते, तर तीन सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होते. ट्रस्टच्या बैठकीनंतर सरचिटणीस चंपत राय यांनी माध्यमांना माहिती दिली.



चंपतराय म्हणाले, "बैठकीत उपस्थित सर्वांनीच मंदिर निर्माणाबाबत आनंद व्यक्त केला. जमिनीवर जे काही अवशेष सापडले ते सर्वानी पहिले व आनंद व्यक्त केला. मातीच्या मजबुतीबाबत अद्याप अहवाल आलेला नाही. अहवालानंतर लार्सन अँड टुब्रो हे काम करेल. ६० मीटर खालच्या मातीचे परीक्षण केल्यानंतर त्यावर मंदिराच्या पायाचे आरेखन होईल. या आरेखनावर पायाभरणी अवलंबून असेल." पुढे ते म्हणाले, "सध्याचा काळ गेल्यानंतर सामान्य स्थिती पुन्हा आल्यानंतर निधी गोळा केला जाईल, त्यानंतर मंदिराच्या आराखड्याचे रेखांकन पूर्ण होईल आणि आमच्या मते ३ ते ३ .५ वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण होईल."

ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले की, भूमिपूजनासाठी आम्ही ३ आणि ५ ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. आता याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान घेतील. यासह त्यांनी सांगितले की राम मंदिराची रचनाही बदलली जाईल. यापूर्वी मंदिरात तीन घुमट बांधले जाणार होते, परंतु आता तेथे पाच घुमट असण्याचा निर्णय विश्वस्त बैठकीत घेण्यात आला आहे. मंदिराचे मॉडेल विश्व हिंदू परिषदेचे राहील, परंतु त्याची लांबी, रुंदी आणि उंची वाढविण्यात येईल. यापूर्वी एएनआयशी बोलताना महंत कमल नयनदास यांनी सांगितले होते, "मंदिर निर्माणाची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. लोकांची इच्छा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा इथे यावे, त्यानंतर निर्माण कार्य सुरू होईल. भूमिपूजनाबद्दल बोलायचे झाले तर, तीन महिन्यांपासून भूमिपूजनासारखेच होम हवन, पूजापाठ सुरू आहे."
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121