‘WHO’कडून धारावी मॉडेलचे कौतुक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2020
Total Views |

WHO_1  H x W: 0



कोरोना नियंत्रणात येऊ शकतो, उदाहरणादाखल घेतले धारावीचे नाव!


मुंबई : एकीकडे महाराष्ट्र कोरोना संक्रमणाने जोरदार लढा देत आहे. त्याचबरोबर डब्ल्यूएचओनेही महाराष्ट्र सरकारच्या या अथक परिश्रमाचे कौतुक केले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्टी धारावी कोरोनो विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यात यशस्वी ठरल्याबद्दल कौतुक केले आहे. एवढेच नव्हे तर धारावीतील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अथक प्रयत्न केल्यामुळे हे क्षेत्र कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.


डब्ल्यूएचओचे महासंचालक ट्रेडोस अधानम गेब्रेयसेन म्हणाले की, "जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात असे दिसून आले आहे, की संसर्ग कितीही उच्च असला तरी तरीही त्यावर नियंत्रण ठेवता येते. आणि यापैकी काही उदाहरणे इटली, स्पेन आणि दक्षिण कोरिया आहेत आणि अगदी धारावी, मुंबईही."


शुक्रवारी धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या २,३५९ वर पोहचली आहे. गेल्या काही दिवसांपासून इथल्या मृत्यूच्या नोंद जाहीर करणे बंद केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी)च्या म्हणण्यानुसार, सध्या धारावी येथे १६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत १९५२ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.





@@AUTHORINFO_V1@@