चिंताजनक : मुंबई कंटेन्मेंट झोनमध्ये तसेच इमारती `सील`मध्ये वाढ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |

Mumbai_1  H x W



झोपडपट्टी विभागात ७५१ कंटेन्मेंट झोन, ६५९७ इमारती सील; कोरोनाबाधितांच्या संख्येतही ५,०६२ ने वाढ


मुंबई : मुंबईत काही ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आजघडीला झोपडपट्टी-चाळवजा विभागात ७५१ कंटेन्मेंट झोन तयार झाले आहेत. या कंटेन्मेंट झोनमध्ये ९,९६,८११ घरे असून तेथे २८,५७५ रुग्ण सापडले आहेत. तर ६,५९७ इमारतींमध्ये २,७९,१०१ सदनिका सील करण्यात आल्या असून तेथे १८,७४५ रुग्ण सापडले आहेत.


मागील आकडेवारीनुसार (३० जून) झोपडपट्टी विभागात ७५० कंटेन्मेंट झोन होते. त्यावेळी २५,९३१ रुग्ण सापडले होते. म्हणजे कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त १ ने वाढ झाली असली तरी रुग्णसंख्येत मात्र २,५३४ ने वाढ झाली आहे. त्याचबरोबर इमारत सील करण्यातही वाढ झाली आहे. ३० जूनच्या आकडेवारीनुसार २४ विभागात ५,८७५ इमारतींमधील ३,५२,८१५ सदनिका सील करण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांमध्ये १६,२१७ रुग्ण सापडले होते. म्हणजे आता ७२२ इमारतींमधील सदनिका सील करण्यात आल्या असून रुग्णसंख्येतही २,५२८ ने वाढ झाली आहे.


मुंबईत काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. त्यांच्या प्रसार वाढू नये म्हणून रुग्ण सापडलेला भाग सील करण्यात येतो. त्यालाच कंटेन्मेंट झान म्हणतात. मुंबईत असे ७५१ कंटेन्मेंट झोन आहेत. सगळ्यात जास्त कंटेन्मेंट झोन एल (कुर्ला) विभागात (९५) आहेत. तेथे ५३९२ घरे असून ११८१ रुग्ण सापडले आहेत. त्या खालोखाल एम-ई (चेंबूर पूर्व) विभागात ७४ कंटेन्मेंट झोन असून ५३,८७४ घरांमधून ८९७ रुग्ण आणि एस (भांडुप) विभागातही ७४ कंटेन्मेंट झोन असून १८,६७० घरे आणि ३,०८७ रुग्ण सापडले आहेत. टी (मुलुंड) विभागात ६२ कंटेन्मेंट झोन आहेत. तेथे १५,१८७ घरे आहेत आणि ५७१ रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर के-वेस्ट विभागात ५६ कंटेन्मेंट झोन असून तेथील घरांची संख्या ५०,३१९ असून १६८२ रुग्ण सापडले आहेत. सर्वात कमी कंटेन्मेंट झोन बी आणि जी-साऊथ विभागात आहेत. बी ( मस्जिद बंदर ) विभागात ५ कंटेन्मेंट झोन असून ३६९ घरे आहेत, तर ५ रुग्ण सापडले आहेत. तर जी-साऊथ (वरळी-प्रभादेवी) विभागात ५ कंटेन्मेंट झोनमध्ये १६,४८१ घरे असून ११५६ रुग्ण सापडले आहेत. जास्त प्रमाणात रुग्ण सापडल्याने महापालिकेच्या २४ विभागात ६,५९७ इमारतीमधील २,९७,१०१ घरे सील करण्यात आली आहेत. या इमारतींमधून १८,७४५ रुग्ण सापडले आहेत.


के-ईस्ट (अंधेरी-जोगेश्वरी) विभागात सर्वात जास्त म्हणजे ७८९ इमारतींमध्ये ५९,१२१ सदनिका सील करण्यात आल्या असून, तेथे १५५७ रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ टी (मुलुंड) विभागात ५६० इमारती सील करण्यात आल्या असून तेथे ९५५ रुग्ण सापडले आहेत. आर साऊथ (दहिसर) विभागात ५३५ इमारतींमधील ३१५ सदनिका सील करण्यात आल्या असून तेथे ८२७ रुग्ण सापडले आहेत. एफ-नॉर्थ (माटुंगा-वडाळा) विभागात ५३२ इमारतींमधील २७७५ सदनिका सील करण्यात आल्या असून तेथे १०५० रुग्ण सापडले आहेत. तर पी-नॉर्थ (मालाड) विभागात ५१० इमारतींमधील ८३२२ सदनिका सील करण्यात आल्या असून १३९३ रुग्ण सापडले आहेत. एकीकडे लॉकडाऊन शिथिल करण्यात येत असताना कंटेन्मेंट झोनमध्ये होणारी वाढ आणि वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंतेची बाब ठरत आहे.




@@AUTHORINFO_V1@@