‘सॅमसंग’ कंपनीचा चीनला मोठा दणका!

    18-Jun-2020
Total Views | 11960

samsung_1  H x


५ हजार कोटींच्या गुतंवणूकीसह ‘सॅमसंग’चा चीनमधला प्रस्तावित प्रकल्प येणार भारतात!



मुंबई : स्मार्टफोननिर्मिती क्षेत्रातील जगभरातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’ उत्तरप्रदेशमध्ये ५३.६७ बिलियन रुपये म्हणजेच ५ हजार ३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीने उत्तरप्रदेशमध्ये स्मार्टफोन डिस्प्ले बनवण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील करारांवर २०१९ च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.


हा प्रकल्प चीनमध्ये प्रस्तावित होता; पण कंपनीला आकर्षक कर सवलती आणि इतर सोयी सुविधा देण्यात आल्याने कंपनीने भारताला पसंती दिल्याचे सांगण्यात येते आहे. या कारखान्यात १३०० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तरप्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.


दरम्यान, सॅमसंग चीनमधून आणखी काही प्रकल्प हलविण्याचा विचार करत आहे. सॅमसंगच्या भारतातील या गुंतवणूकीमुळे देशातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सॅमसंग ही जगातील सर्वात मोठी ‘OLED’ डिस्प्ले बनवणारी कंपनी आहे. सॅमसंगने हाच ओएलईडी प्रकल्प उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे उत्तर प्रदेशचे उद्योग मंत्री सतीश महाना यांनी सांगितले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारावरून चीनवर अनेक देशांची नाराजी आहे. त्यामुळे भारत चीनमध्ये असलेल्या विविध कंपन्यांना आकर्षित करत आहे. विशेष म्हणजे अनेक कंपन्यांनी भारतात आपले प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121