मनश्री आर्टस् आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-May-2020
Total Views |

Manshree_1  H x


कथालेखन स्पर्धेला नवोदित लेखकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद 


मुंबई : संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे लॉकडाऊनमध्ये अडकला आहे. लॉकडाऊनमुळे घरीच अडकलेल्या सगळ्यांचाच वेळ सत्कारणी लागावा म्हणून मनश्री आर्टस् ह्या संस्थेने महाराष्ट्र आणि गोवा ह्या दोन राज्यांसाठी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला होता. मनश्री आर्ट्सच्या संतोष जढाळ यांनी ऑनलाईन कथा लेखन स्पर्धेचचे आयोजन केले होते. यात सगळ्यांना आपल्या कथा ई-मेलद्वारे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेला नवोदित लेखकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात सांगलीच्या वैभव पाटील यांच्या ‘जोंधळ्याचा पाऊस’ या कथेला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. अलिबागच्या श्रद्धा पोखरणकर यांच्या ‘अपूर्ण’ या कथेला द्वितीय आणि मुंबईच्या विजय निकम यांच्या ‘मोदक’ या कथेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. कोथरूडच्या मुक्त बाम यांची ‘यात्रा’ ही कथा आणि कॅलिफोर्नियाच्या अनुप्रिता ओक यांच्या ‘क्वारंटाईन’ या कथांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. वाशीमच्या प्रथमेश दिग्रजकर यांच्या ‘सुमडीत कोंबडी’ या कथेला ‘विशेष विनोदी कथा’ म्हणून पारितोषिक प्राप्त झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@