‘प्रसारभारती’च्या सीईओंनी नाकारले ‘बीबीसी’चे निमंत्रण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Mar-2020
Total Views |

prasarbharati_1 &nbs
 
 
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यास (सीएए) विरोध करण्याच्या नावाखाली दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे एकांगी वार्तांकन केल्याचा आरोप करत ‘बीबीसी’च्या एका कार्यक्रमाचे निमंत्रण ‘प्रसारभारती’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शशी शेखर वेम्पटी यांनी नाकारले आहे. तसे त्यांनी ‘बीबीसी’चे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांनी लेखी कळविले आहे.
 
 
‘बीबीसी’तर्फे ‘इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर’ या पुरस्कार सोहळ्यासाठीचे निमंत्रण ‘प्रसारभारती’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पटी यांना पाठविले होते. मात्र, वेम्पटी यांनी ‘बीबीसी’चे ते निमंत्रण नाकारले आहे. ‘बीबीसी’ने दिल्लीतील हिंसाचाराचे अतिशय एकांगी पद्धतीने वार्तांकन केल्याचे वेम्पटी यांनी ‘बीबीसी’चे डायरेक्टर जनरल टोनी हॉल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. बीबीसीने सध्या मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही पोर्टल्स सुरू केली आहेत, त्यावरून होणाऱ्या एकांगी आणि बरेचदा द्वेष पसरविणाऱ्या मजकुराविरोधात समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत असते.
 
 
वेम्पटी यांनी आपल्या पत्रात योगिता लिमये यांच्या एका व्हिडिओ वार्तापत्राचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये लिमये यांनी दिल्ली पोलिसांविरोधात एकांगी वार्तांकन केले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वार्तापत्रात कोठेही दिल्ली पोलिसांवर हिंसक जमावाने केलेला हल्ला, हल्ल्यात कॉन्स्टेबल रतनलाल यांची करण्यात आलेली हत्या, हिंसक जमावाच्या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेले दिल्लीचे पोलीस उपायुक्त यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे शंभरच्या वर वार करून हत्या करण्यात आलेले गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकीत शर्मा यांच्या हत्येविषयीदेखील एका शब्दानेही काही म्हटले नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. अशा प्रकारच्या एकांगी वार्तांकनाचा निषेध म्हणून आपण कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारीत असल्याचे वेम्पटी यांनी पत्रात म्हटले आहे.
 
 
यापुढे सार्वभौमत्वाचा आदर ठेवाल, अशी अपेक्षा....
 
 
‘वेम्पटी यांनी एकांगी वार्तांकनाविषयी भविष्यात काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे बीबीसीने अन्य देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे, यापुढे त्याचेही भान ठेवले जाईल,’ असेही वेम्पटी यांनी पत्राच्या अखेरीस म्हटले आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@