पु्ण्यातील सोसायटीत अडकलेल्या खवले मांजराची सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2020
Total Views |

pangolin _1  H  

 

रहिवाशांच्या प्रसंगावधानाने खवले मांजराचे प्राण वाचले

 
 

मुंबई (प्रतिनिधी) - कोरोनाचा मानवी संसर्ग खवले मांजरामुळे झाल्याचा संदेश समाजमाध्यमांवर फिरत असताना आज पहाटे पुण्याच्या कोंढवे धावडे परिसरातील एका सोसायटीत अडकलेल्या खवले मांजराला जीवदान देण्यात आले. 'सह्याद्री निसर्ग मित्र', 'वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन',वन विभाग आणि स्थानिक पोलीसांनी साडे चार फुटाच्या या खवले मांजराचा बचाव केला. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.
 
 
 
 
 
 
कोरोनाचा संसर्ग खवले मांजरामुळे मानवामध्ये आल्याच्या बातम्या सध्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत. मात्र, या वृत्ताला शास्त्रज्ञांनी दुजोरा दिलेला नाही. तसेच खवले मांजरामुळेच कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब अजूनही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली नाही. अशा परिस्थितीत आज पहाटे ४ वाजता पुण्यातील उत्तमनगर कोंढवे धावडे येथील हरितारा सोसायटीतील रहिवासी अमर जाधव यांना सोसायटीच्या आवारात खवले मांजराचे दर्शन घडले. त्यांनी तातडीने ही माहिती वन्यजीव प्रेमींना दिल्यावर 'सह्याद्री निसर्ग मित्र' आणि 'पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन'चे सदस्य प्रसाद गोंड व प्रतीक महामुनी घटनास्थळी दाखल झाले. जागेची पाहणी केल्यावर त्यांना याठिकाणी साडे चार फूट लांबीचे खवले मांजर आढळले.
 
 
 

pangolin _1  H  
 
 
या दोन्ही वन्यजीवप्रेमींनी खवले मांजराला पकडून त्याची माहिती पोलीस व वन विभागाला दिली. उत्तमनगरचे पोलीस अधिकारी मरगळे व वनाधिकारी सुनीता कुचगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करुन खवले मांजराला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडल्याची माहिती प्रसाद गोंड यांनी दिली. वाचविण्यात आलेले खवले मांजर साडेचार फुटांचे नर मांजर होते. त्याचे वजन अंदाजे १० ते १२ किलो होते.
@@AUTHORINFO_V1@@