वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2020
Total Views |


newsppaer_1  H



नवी दिल्ली : वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरस पसरतो, या वृत्ताला फेटाळून लावत वृत्तपत्रामुळे कोरोना पसरण्याचा धोका अत्यंत कमी असल्याचे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने सांगितले आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशातील ७२८ जिल्ह्यांपैकी ६०६ जिल्हे संपूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना देशासह जगभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी टिव्ही, वृत्तपत्र व सोशल मीडिया हे पर्याय उपलब्ध आहेत.

 


अशातच लोकांमध्ये एक अफवा पसरली होती की
, वृत्तपत्रांमुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका आहे. परंतु, हा निव्वळ गैरसमज आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशननेदेखील ही बाब फेटाळून लावली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने सांगितल्यानुसार, एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचते. म्हणजेच, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत कमी असते.



अमेरिकेतील एका वैद्यकिय संस्थेने सांगितल्यानुसार
, वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता नसल्यातच जमा आहे. संस्थेने सांगितले की, वृत्तपत्रामुळे कोरोनाचा व्हायरस पसरणे अशक्य आहे. दरम्यान, देशावर कोरोनाचे संकट सतानाच अनेक गोष्टींपासून लांब राहण्यास सांगण्यात येत आहे. अशातच अनेकजण हाताळत असलेल्या वस्तूंपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे वृत्तपत्रे मासिकांपासून लांब राहा असे सांगण्यात येत आहे. परंतु, हा गैरसमज असून तुमच्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. एवढचे नाहीतर वृत्तपत्र छापण्याच्या प्रक्रियेत कर्मचारीही काळजी घेत आहेत. वृत्तपत्र सॅनिटाइज केल्यानंतरच प्रेसमधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवले जात आहे. तसेच वृत्तपत्रांची छपाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशिन्स पूर्णपणे ऑटोमॅटिक आहेत. त्यामुळे वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरस पसरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

@@AUTHORINFO_V1@@