राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूका स्थगित

    17-Mar-2020
Total Views | 53

mec_1  H x W: 0



मुंबई
: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.


मदान यांनी सांगितले की, राज्यात कोरोना विषाणूचा (कोव्हिड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगास केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा १० ऑगस्ट २००५ रोजीच्या निकालानुसार नैसर्गिक आपत्ती अथवा आकस्मिक परिस्थिती उद्‌भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने सर्व निवडणुकांशी संबंधित प्रभाग रचना, मतदार यादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी स्वरूपाचे सर्व कार्यक्रम आज (ता.१७) आहे त्या टप्प्यांवर स्थगित केले आहेत.



राज्यातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच नाशिक, धुळे, परभणी व ठाणे महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. वसई- विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, भडगाव, वरणगाव, केज, भोकर आणि मोवाड या नऊ नगरपरिषदा/ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्या; तसेच सुमारे १२ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेसंदर्भात कार्यवाही सुरू होती. या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसंदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पोलिसांवर कट्टरपंथींची दगडफेक! अतिक्रमणाला विरोध केला म्हणून हिंदूंवरही हल्ला; शिव मंदिर परिसराची तोडफोड

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथे हिंदूंवर आणि पोलिसांवर देखील काही इस्लामिक कट्टरपंथी जमावाने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. येथील शिव मंदिराच्या जमिनीवरील अतिक्रमणाविरुद्ध हिंदू समुदायाच्या लोकांनी निषेध केला असता कट्टरपंथींनी मंदिरावरही हल्ला करत मंदिर परिसराची देखील तोडफोड केल्याचे दिसतेय. दरम्यान जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली व परिसरातील दुकाने आणि वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास येतेय. यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे...

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या नौदल पराक्रमाची गाथा मांडणारे संग्रहालय उभारणार

मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या तटबंदीवर उभा असलेला शिवरायांचा ८३ फूट उंच पुतळा केवळ स्मारक नाही, तर मराठा आरमाराच्या तेजस्वी परंपरेचे जागृत प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर निर्माण केलेले भारतीय इतिहासातील पहिले स्वकीय आरमार, ही केवळ दूरदृष्टी नव्हे, तर सागरी सुरक्षिततेची स्वाभिमानी घोषणा होती. या परंपरेला नव्याने उजाळा देण्यासाठी राजकोट किल्ल्याच्या परिसरात ‘शिवआरमार’ संग्रहालय उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. बुधवार, दि. ११ जून रोजी त्यास मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121