हिंसाचार भडकवणाऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Delhi _1  H x W





आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू


 
 
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारात १३ जणांचा मृत्यू झाला असून ५६ पोलिस आणि १५० नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, अशा हिंसाचार भडकवणाऱ्या समाजकंटकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत.


 
दरम्यान, सोमवारी हिंसाचार उसळलेल्या खजुरी खास भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायब राज्यपाल अनिल बैजल आणि पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक उपस्थित होते. "हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यांच्या हौतात्म्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत," अशी प्रतिक्रिया यावेळी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिली.  दरम्यान, मंगळवारी दिल्लीतील अनेक भागांत आंदोलकांनी हिंसाचारा करत थैमान घातले. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक केली. तसेच निमलष्करी दलाच्या जवानावर अ‍ॅसिड हल्ला करण्याचे निर्घृण कृत्यही आंदोलकांनी केले.

 
मुंबईला अतिदक्षतेचा इशारा
 
 
राजधानी दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस खबरदारी बाळगत आहे, असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. तसेच आझाद मैदानाचा परिसर वगळता मुंबईत इतरत्र कोणत्याही ठिकाणी निदर्शने करण्याची कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही, असेही या सूत्रांनी सांगितले. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठीच हा उपाय योजल्याचे सांगण्यात आले आहे.


@@AUTHORINFO_V1@@