निर्भया प्रकरण : दोषी विनयची याचिका फेटाळली

    22-Feb-2020
Total Views | 64

निर्भया दोषी _1 &nbs
नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेमुळे दोषी मानसिक तणावाखाली येणे साहजिक आहे, मात्र दोषी विनयला आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. असे सांगत दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयाने विनयची याचिका शनिवारी फेटाळून लावली.

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना येत्या ३ मार्च रोजी फाशी देण्यात येणार आहे. प्रकरणातील दोषी विनय याने काही दिवसांपूर्वी तुरुंगातील भिंतीवर डोके आपटून घेत स्वतला जखमी केले होते. त्यानंतर त्याच्या वकीलांनी न्यायालयात याचिका दाखल करीत विनयवर चांगल्याप्रकारे उपचार करण्याची विनंती केली होती. त्याचप्रमाणे विनय यास क्रित्झोफ्रेनीया हा मानसिक आजार झाला असल्याचाही दावा याचिकेत करण्यात आला होता.

सदर याचिकेवर पतियाळा हाऊस न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीत तिहार तुरुंग प्रशासनाने विनयचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर केला. त्यावेळी न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे, त्यामुळे दोषी मानसिक तणावाखाली येणे साहजिक आहे. मात्र, दोषी विनयला आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार पुरविण्यात आले असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

दरम्यान, विनयची याचिका म्हणजे फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीमध्ये उशीर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप निर्भयाची माता आशा देवी यांनी केला. दोषी कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत पळवाट काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी ३ मार्च रोजी त्यांना फाशी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121