मुंबई : (Vasantdada Patil Pratishthan's College of Engineering and visual arts) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या जिल्हा फेरीत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी आणि व्हिज्युअल आर्ट्स महाविद्यालयाने भव्य कामगिरी करत एकूण पाच पारितोषिके पटकावली आहेत.
झोन २ अंतर्गत झालेल्या या युवा महोत्सवात एकूण २५ महाविद्यालयांमधून सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी घेतला होता. एकूण १३ विविध स्पर्धात्मक प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. या यशामागे विद्यार्थ्यांची निष्ठा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठबळाचा मोलाचा वाटा आहे. महाविद्यालय प्रशासनाने विजेत्यांचे विशेष कौतुक करत पुढील फेऱ्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे विजयी विद्यार्थी :
साहित्य कथाकथन (हिंदी) गट ब: वंशिका शुक्ला – प्रथम क्रमांक
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\