अनघट देवराईची भाषा

    11-Aug-2025
Total Views |

देवराईतले काही क्षण असे असतात जिथे आपण सगळं विसरून जातो. कोल्हापूरच्या मिसाळवाडी देवराईत देखील असेच काहीसे घडते. या देवराईची माहिती देणारा हा लेख...

कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल परिसर अनेक देवरायांनी व्याप्त आहे. इथल्या देवराया फिरताना १०० वर्षांपूर्वीपर्यंत जंगलाचे स्वरूप कसे असेल, याची प्रचिती येते. घाटातून मिसाळवाडीची देवराई गावाबाजूच्या टेकडावर निवांत पहुडलेली दिसते. मिलिटरीवाले जसा केसांचा ‘क्रू’ कट करतात, तसे आजूबाजूला सगळा ओसाड भाग आणि मध्येच उंच टेकाडावर १० ते १२ एकरावर पसरलेला झाडोरा. त्या गच्च घनवनाची ‘कॅनोपी’ पाहून या भागात जंगलाचे कोणेकाळी काय वैभव असेल, असा विचार मनात येतो. मिसाळवाडीची देवराई १२ एकरांची तशी लहान देवराई. एक चिंचोळी वाट. एकमेकांत गुंतलेल्या महावेली-महावृक्ष. जमिनीवर इतस्ततः पडलेला पालापाचोळा रिचवत उभी देवाची भूमी. इथे भैरवनाथाचे मंदिर आहे. देवालय जुने असले, तरी आता रंगित बांधकाम झालेले आहे. इथल्या गर्द राईतल्या वाटेवर उंचच उंच अंबेरी, रानबिब्बा, उदंड वाढलेले छोटे-मोठे दिंडे दिसतात. मध्येच एखादा फणशी डोकवतो. चेराचे झाड अस्तित्व दाखवून जाते.

उन्हाळ्याच्या दिवसात लख्ख ऊन देवराईच्या गर्द झाडीने फिल्टर होते. दोन ओढ्यांमध्ये केतकीचे बेट आणि काळ्या उंबराची कवकवित झाडे दिसतात. काळ्या उंबराला करवती म्हणतात. बाजूला दोन खरवताची म्हणजे FICUS EXASPERATA ची झाडे फळांनी लगडलेली असतात. खरवत आणि करवती दोन्ही वेगवेगळ्या पण वड कुळातल्याच प्रजाती. पक्षांचे आवडते खाद्य. देवराईची डावी बाजू पथरफोडी BRIDELIA STIPULARIS वेलीच्या जाळीने भरलेली आहे. या वेलीच्या फुलांवर मधमाशांचा गुंजारव असतो, तर पिया फळांवर छोटे पक्षी निर्भिडपणे ताव मारत असतात. CARISSA SPINARUM हा वेली करवंदांचा प्रकार ठिकठिकाणी फळांनी लगडलेला दिसतो. बोराएवढे मोठे करवंद. हे करवंद निबीड जंगलातच मिळते. जून संपताना ही करवंद पिकायला येतात, जेव्हा नेहमीच्या करवंदाचा हंगाम संपालेला असतो.

देवराईत झाडावरचं फळ तोडायचं नाही. ते खाद्य आहे तिथल्या जीवसंस्थेचे. त्यावर त्यांचा अधिकार. कडुलिंबाच्या कुळातला तुसळ (HEYNEA TRIJUGA) देखील या देवराईत फुलतो. मंद सुगंध असणारी ही फुलं. जर तुम्हाला कुठे देवराईत ही फुलं फुललेली दिसली, तर फुलांचा वास घ्या. तो मंद, भरीव, जडसर सुगंध कायमचा ठेवणीत राहतो. तुसळच्या विरुध्द बाजूला आत एक उंच झाड दिसते. बदामाच्या आकारासारखी फळ घोसात लगडलेली दिसतात. हे झाडे म्हणजे ढाका. PRUNUS CEYLANICA ही प्रजाती IUCN नुसार नष्टप्राय होण्याच्या स्थितीतील आहे. ढाका हे झाड आपल्या खाण्याच्या बदामाच्या कुळातले आहे.

मिसाळवाडीची देवराई फिरताना तिला प्रदक्षिणा घालावी लागते. कारण, प्रदक्षिणेत बाहेरच्या बाजूला असंख्य वृक्ष सूर्यप्रकाशात लख्ख ओळखता येतात. केळ वड (FICUS TSJALELA), नांदरूख FICUS) , सारख्या वयस्कर वड वर्गातल्या वृक्षांनी देवराईला वेढा घातलेला आहे. पावसाळ्यात चांदकुडा. फुलून त्यातील फळे फुटून बिया बाहेर पडतात. असे याचे लांबलचक शास्त्रीय नाव. बसया शिंगासारख्या जोडशेंगांचा फोटो सोबत दिला आहे. हेही आजकाल जंगलभागात कमीच दिसू लागले आहे. देवराईतील उत्तरेचा डोंगर उतरला की वाटनवेलाच्या फळांची भली थोरली अजस्र भिंत तयार झालेली दिसते. ओढ्याच्या बाजूने फळांवर आलेले दिसते. बाजूला काही वाळुंज झुलताना दिसतात.

देवराई उतरून येताना मुख्य रस्त्याला अश्रलळूळर लहळपशपीळी म्हणजे उडळ झाडाचे दर्शन होते. शिरीष प्रजातीतला हा पाचवा प्रकार. याची पानाच्या देठाजवळची पर्णके पाहण्यासारखी असतात. हेही संख्येने कमी झालेले झाड आहे. उडळ बघता बघता दुर्मीळ झालेली खडशिंगी दिसते. मिसाळवाडीची देवराई तशी लहानखुरी. या १२ एकरांवर टिकलेल्या या वनसंपदेला पाहून कोणेकाळी आजूबाजूचा परिसरही किती सुंदर असेल, याची कल्पनाच आपण करू शकतो. आता फक्त १२ एकर देवराईचे म्हणून जंगल टिकले.

वनस्पतींचे जग हे विस्मयकारी. प्रेमळ आणि आकर्षक आहे. तितकेच ते अवघड आहे. अनघट आहे. त्याहीपेक्षा हा सह्याद्री हळवा असावा, म्हणून इतया सुरेख वनस्पती तरारल्या. खडकावर नाजूक वेलींची गुंफणं माळली. इशसेपळर लीशपरींर सारख्या खडकअंबाडी कुळातल्या भलत्या नाजूक वनस्पती काळ्या कभिन्न ताशीव कड्यावर फक्त सह्यगिरीच वाढवू शकतो. कडेकातळाच्या राकट कणखर ओळख असलेल्या सह्याद्रीची ही हळवी बाजू झाडांसाठी या सह्यगिरीत फिरणार्‍याना, झाडांवरती नितांत प्रेम करणार्‍याना सतत जाणवत राहते.

रोहन पाटील
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)
७३८७६४१२०१