मुंबई : (Dahi Handi and Anant Chaturdashi holidays cancelled) दरवर्षी मुंबई शहर आणि उपनगरांत दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तसेच अनंत चतुर्दशीला देखील बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी असते. या दोन्ही दिवशी दरवर्षी मुंबई शहर आणि उपनगरांत शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांना सुट्टी असते. परंतु यंदा मात्र या दोन्ही सणाला सुट्टी न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) (दि. १६ ऑगस्ट, २०२५) व अनंत चतुर्दशी (दि. ०६ सप्टेंबर, २०२५) या ऐवजी नारळी पौर्णिमा (दि. ०८ ऑगस्ट, २०२५) व ज्येष्ठगौरी विसर्जन (दि. ०२ सप्टेंबर, २०२५) निमित्ताने स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय… pic.twitter.com/qPajKAYz52
२०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) शनिवार, दि. १६ ऑगस्ट आणि अनंत चतुर्दशी शनिवार, दि. ०६ सप्टेंबर याऐवजी नारळी पौर्णिमा शुक्रवार दि. ०८ ऑगस्ट आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन मंगळवार दि. ०२ सप्टेंबर निमित्ताने स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आली आहे, असे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे.
शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्टीत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार, गोपाळकाळा म्हणजेच दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठ गौरी विसर्जनला सुट्टी असणार आहे. हे आदेश मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांना लागू असतील, असे राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\