एक निशाणा 'यशाचा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

Anjum-Moudgil_1 &nbs

 


महिलांच्या ५० मीटर एअर रायफल विश्वकरंडक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून देत भारताची मान जगभरात उंचावणारी महिला नेमबाजपटू अंजुम मौदगिलच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



आज एकविसाव्या शतकात विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करणा
र्‍या भारताने विश्वात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करण्यात यश मिळवले आहे. कृषी, वाहननिर्मिती, माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आदींसह अनेक क्षेत्रांमध्ये भारताने आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



या सर्वांसोबतच क्रीडाक्षेत्रातही भारताने उज्ज्वल यश मिळवले असून जागतिक दर्जाच्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंची नावे सातासमुद्रापार प्रसिद्ध आहेत
. जगात 'क्रिकेटवेडा देश' म्हणून भारताची ओळख असली तरी, अन्य क्रीडा प्रकारांमध्येही भारतीय खेळाडूंनी जगासमोर आपली एक वेगळी छाप पाडली असून त्यांचे कौतुक करावे तितके कमीच. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ यांसह विविध जागतिक स्पर्धांमध्ये पदके पटकावून त्यांनीही भारताची मान जगभरात अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे 'क्रिकेटवेडा देश' म्हणवणार्‍या भारतात असे खेळाडूही घडतात याचेच संपूर्ण विश्वाला नवल वाटते.


भारतातील अनेक खेळाडू जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदक पटकावून आपल्या देशाची मान उंचावतात
. महिला नेमबाजपटू अंजुम मौदगिल ही त्यांपैकीच एक. जुलै महिन्यात जपानची राजधानी टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी महिलांच्या '५० मीटर एअर रायफल' स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणारी अंजुम मौदगिल ही खरोखरच कौतुकास पात्र आहे. २०१८ साली मेक्सिको येथे झालेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या '५० मीटर एअर रायफल थ्री पोझिशन'मध्ये अंजुमने भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. अवघ्या दोन गुणांनी तिचे सुवर्णपदक हुकले. महिलांच्या '५० मीटर एअर रायफल' स्पर्धेत आत्तापर्यंत भारतासाठी कुणीही सुवर्णपदक पटकाविलेले नाही. मात्र, आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अंजुम मौदगिल सध्या जोरदार तयारी करत असून भारताला यात सुवर्णपदक मिळवून देण्याचा निर्धार तिने केला आहे.


अंजुम मौदगिल ही मूळ पंजाबची
. पंजाबची राजधानी चंदिगढ येथे तिचे कुटुंब वास्तव्यास आहे. ५ जानेवारी, १९९४ साली तिचा जन्म झाला. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली अंजुम एकेदिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज होईल, असा स्वप्नातही विचार केला नसल्याचे तिचे कुटुंबीय सांगतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नेमबाज होण्याचे स्वप्न तिने बाळगले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले, असे मौदगिल कुटुंबीय आनंदाने सांगतात.


अंजुम ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती
. शालेय परीक्षांमध्ये चांगले गुण मिळत असले तरी जागतिक दर्जाच्या क्रीडा प्रकारांमध्येच तिला सर्वाधिक रस होता. 'राष्ट्रीय कॅडेट कोअर' (एनसीसी) हा बहुतांश नेमबाजांचा पाया असतो. शालेय शिक्षणादरम्यान अंजुमनेही ही संधी सोडली नाही. 'एनसीसी'च्या प्रशिक्षणादरम्यान सर्वात आधी तिने रायफल हाताळण्यास सुरुवात केली. मात्र, ही रायफलच तिच्या संपूर्ण करिअरचा भाग होऊन बसली. 'एनसीसी'मध्ये रायफलचा सराव करतानाच तिने नेमबाजपटू होण्याची जिद्द मनाशी बाळगली आणि यासाठी कसून सराव केला. 'एनसीसी'सोबतच एअर रायफल प्रशिक्षण मिळविण्यासाठी तिने प्रयत्नही सुरू केले. २०१३ साली तिच्या रायफल नेमबाजीतील प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांच्या नेतृत्वात तिने कसून सराव सुरू केला.


'एअर रायफल थ्री पोझिशन'मध्ये तिने खेळण्याचा निर्णय घेतला. २०१४ साली झालेल्या 'गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धे'मध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली. या संधीचे अंजुमने सोने केले. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केल्यानंतर ती सर्वत्र प्रकाशझोतात आली. यानंतर विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक पटकाविण्याचा तिचा धडाका कायम ठेवला.


अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी कामगिरी करणा
र्‍या अंजुमला द. कोरिया येथे पार पडलेल्या '१० मीटर एअर रायफल विश्वकरंडक स्पर्धे'त खेळण्याची संधी मिळाली. येथे रौप्यपदाकाची कमाई करत अंजुमने जुलै महिन्यात होणार्‍या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजीमध्ये भारताचे स्थान निश्चित केले. या स्पर्धेआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत 'एअर रायफल थ्री पोझिशन'मध्ये तिला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण, निराश न होता कोरियातील स्पर्धेत पराक्रम गाजवत आपणही उत्तम नेमबाजपटू असल्याचे तिने जगाला दाखवून दिले. जागतिक पातळीवर भारताची मान उंचावणार्‍या अंजुम मौदगिलला प्रतीक्षा आहे ती आता ऑलिम्पिक स्पर्धेतसुवर्णपदक पटकाविण्याची. यासाठी ती सध्या कसून तयारी करत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा...!




- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@