वाहनचालकांनी 'या' तारखेपर्यंत फास्टॅग बसवून घ्या

    31-Dec-2020
Total Views | 57

fastag_1  H x W




जाणून घ्या फास्टॅग मिळवण्याची प्रक्रिया



मुंबई: केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा दिला आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्‍टॅग अनिवार्य केला आहे. आणि आता फास्‍टॅग लावण्याची मुदत सुद्धा १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १ जानेवारी २०२१ पर्यंत होती.

या नियमानुसार आता वाहनचालकांना १५ फेब्रुवारीपर्यंत आपल्या वाहनांमध्ये फास्टॅग लावून घ्यावा लागणार आहे. केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी चार चाकी वाहनांनासाठी १ जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केले होते. परंतु वाहन चालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.


फास्टॅग ही टोल भरण्याची इलेक्ट्रॉनिक, संपर्करहित परिणामी वेळ वाचवणारी आणि सुरक्षित यंत्रणा आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी टोलनाक्यावर विविध बँकांचे एजंट आणि एनएचएआयमार्फत काऊंटर लावण्यात आले आहेत. NHAI आणि २२ वेगवेगळ्या बँकेतून फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो. मुख्य म्हणजे पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
उपराष्ट्रपतीपदासाठी ‘इंडी’आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर! काँग्रेस अध्यक्षांकडून नावाची घोषणा

उपराष्ट्रपतीपदासाठी ‘इंडी’आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर! काँग्रेस अध्यक्षांकडून नावाची घोषणा

(B Sudarshan Reddy Named INDI Alliance Vice President Candidate) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध इंडी आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121