मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय! जाणून घ्या...

    19-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.
(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला - कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता.
(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता.
(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....