सरकारी कर्मचाऱ्यांनो जीन्स टीशर्टवर ऑफिसला जाऊ नका ! अन्यथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2020
Total Views |

MH_1  H x W: 0


मुंबई : सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जिन्स किंवा टी-शर्ट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कार्यालयातील पोशाखाबाबत सरकारने नवी मार्गदर्शिका लागू केली आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये काम करणार्‍या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड मार्गदर्शिका असणार आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचारी वर्गात काहीशी नाराजी असली तरीही सर्वसामान्यांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केली आहे.
 
 
 
आता सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नेहमी तो कंत्राटी स्वरूपातील अधिकारी-कर्मचारी सल्लागार त्यांच्यासाठी कार्यालयात घालण्यात येणाऱ्या कपड्याला ही ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यापुढे जीन्स आणि टी-शर्ट ला शासकीय कार्यालयात बंदीच असेल. राज्य सरकारतर्फे ८ डिसेंबरपासून हा अध्यादेश लागू करण्यात आला आहे.
 
 
 
राज्य सरकारच्या अंतर्गत येणारी सर्व कार्यालये, मंत्रालयाच्या अधिनस्त असलेली सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये या ठिकाणच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू होणार आहे. राज्य शासनाचा कारभार पाहणारे सर्व कर्मचारी सरकारचे जनमानसातील प्रतिनिधी म्हणून पाहण्यात येतात या कार्यालयांमध्ये राज्यभरातील खासदार आमदार नगरसेवक लोकप्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक भेट देतात. अशावेळी सर्व प्रकारचे अधिकारी कर्मचारी यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्वाचा भाग म्हणून पाहिला जातो त्यामुळे हा निर्णय लागू घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
 
 
सर्व अधिकाऱ्यांसाठी नियमावली काय ?
 
 
वेशभूषा सरकारी कार्यालयाला अनुरुप असावी.
 
दैनंदिन पेहरावात शासकीय कर्मचाऱ्यांना शोभनीय असावा
 
दोन सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिधान केलेला हा व्यवस्थित असावा
 
 
 
महिलांसाठी सूचना
 
महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात साडी सलवार चुडीदार कुर्ता ट्राऊझर पॅन्ट व त्यावर कुर्ता अथवा तसेच आवश्यकता असल्यास दुपट्याचे पेहराव करणे आवश्यक असेल.
 
 
 
पुरुषांसाठी सूचना
 
पुरुषांनी शर्ट-पॅन्ट ब्राऊजर पँट, असा पेहराव करावा गडद रंगाचे चित्र विचित्र नक्षीकाम चित्र असलेले पेहराव परिधान करू नये. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जीन्स व टी शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये, असा आदेश शासनाने काढलेला आहे त्याचबरोबर इतर काही मार्गदर्शक सूचनाही शासनाकडून कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@