खासदार नारायण राणेंना कोरोनाची लागण

    01-Oct-2020
Total Views |

narayan rane_1  


मुंबई :
माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते खासदार नारायण राणे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढचे काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहोत, असेही राणे यांनी सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती देताना नारायण राणे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन, असे त्यांनी सांगतले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121