सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी ; ३५ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


iran_1  H x W:


तेहरान : जनरल कासिम सुलेमानीचा मृतदेह 'करामन' येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता, याठिकाणी  झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ लोक ठार आणि सुमारे ४८लोक जखमी झाले ही माहिती वृत्तसंस्था इराण स्टेट टीव्हीने दिली आहे. अंत्ययात्रेमध्ये सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने लोक करामन येथे आले आहेत. तेहरान, कोम, मशहाद आणि अहवाज या शहरांमध्ये अशाच प्रकारे लोक रस्त्यावर उपस्थित होते. आझादी चौकात मोठ्या संख्येने लोक जमले जेथे राष्ट्रध्वजांनी लपेटलेले दोन ताबूत ठेवले होते. एका ताबूत सुलेमानी यांचे असून दुसरे त्यांचे निकटवर्तीय ब्रिगेडियर जनरल हुसेन पुराजाफरी यांचे देह ठेवण्यात आले आहे. दुपारी अडीच ते साडेचारच्या दरम्यान शहीदांच्या स्मशानभूमीत सुलेमानीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान असेल.



अमेरिकेचा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना व्हिसा देण्यास नकार

अमेरिकेने इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद जरीफ यांना व्हिसा देण्यास नकार दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते सहभागी होणार होते.



अमेरिकन सैन्य इराणमध्ये दहशतवादी घोषित

बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुड्स फोर्सचा कमांडर कासिम सुलेमानीची हत्या झाली. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव आता शिगेला आहे. इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे की त्याचे दुष्परिणाम अमेरिकेने भोगायला तयार असले पाहिजे. त्याचवेळी, इराणच्या संसदेने मंगळवारी सर्व अमेरिकी सैन्यांना दहशतवादी घोषित करीत एक विधेयक मंजूर केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@