फैज यांची कविता हिंदुद्वेष्टी ? चौकशीसाठी समिती गठीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2020
Total Views |



IIT _1  H x W:



नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरमधील निवडक विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी निदर्शने केली होती. या निदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी उर्दूतील सुप्रसिद्ध शायर 'फैज अहमद फैज' यांच्या काही ओळी म्हटल्या होत्या. संस्थेतील काही विद्यार्थी व प्राध्यापकांनी फैज यांच्या या शायरीला आक्षेप घेतला होता. ही शायरी हिंदू विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यातून नवा वाद निर्माण झाला असून ही शायरी हिंदू विरोधी आहे की नाही, यावर विचार करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.



१७ डिसेंबर रोजी भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपुरमधील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील जामिया मिलियामधील विद्यार्थ्यांवरील
हल्ल्याचा निषेध करत एका मोर्चाचे आयोजन केले होते. या निदर्शनांदरम्यान विद्यार्थ्यांनी 'लाज़िम है कि हम भी देखेंगे,वो दिन कि जिस का वादा है' ही कविता गायली होती. यावर भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरचे उपसंचालक मनिंद्र अग्रवाल यांनी मात्र या गीतावर आक्षेप घेत ही कविता हिंदूद्वेष्टी असल्याचे वक्तव्य केले होते.'या कवितेत सर्व मूर्त्या नष्ट केल्या तरी अल्लाहचे अस्तित्व कायम राहणार आहे,'असे सांगण्यात आले आहे.असे अग्रवाल यांचे म्हणणे आहे. अग्रवाल यांनी सोशल मीडियावर जातीयवादी मजकूर पोस्ट केल्याचा आरोप करत त्या मजकुरावर बंदी घातली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यानेही ही कविता कशी जामियामध्ये घडलेल्या घटनेला लागू आहे याचे स्पष्टीकरण देणारा लेख आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. त्यामुळे आता ही शायरी वादग्रस्त आहे कि नाही हे ठरविण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरने एक अंतरिम चौकशी समिती गठित केली आहे. या उच्चस्तरीय समितीचा अंतिम अहवाल आल्यावरच आता पुढील कारवाई केली जाणार आहे. १५ दिवसात ही समिती आपला अहवाल सादर करेल असे आयआयटी, कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांनी म्हटले आहे.

फैज अहमद यांची पूर्ण कविता :

हम देखेंगे

लाज़िम है कि हम भी देखेंगे

वो दिन कि जिसका वादा है

जो लोह-ए-अज़ल में लिखा है

जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां

रुई की तरह उड़ जाएँगे

हम महक़ूमों के पाँव तले

ये धरती धड़-धड़ धड़केगी

और अहल-ए-हक़म के सर ऊपर

जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से

सब बुत उठवाए जाएँगे

हम अहल-ए-सफ़ा, मरदूद-ए-हरम

मसनद पे बिठाए जाएँगे

सब ताज उछाले जाएँगे

सब तख़्त गिराए जाएँगे

बस नाम रहेगा अल्लाह का

जो ग़ायब भी है हाज़िर भी

जो मंज़र भी है नाज़िर भी

उट्ठेगा अन-अल-हक़ का नारा

जो मैं भी हूँ और तुम भी हो

और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा

जो मैं भी हूँ और तुम भी हो





@@AUTHORINFO_V1@@