स्वच्छतेचा जागर : जर्मनी व्हाया नाशिक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2020   
Total Views |



nashik_1  H x W



जगातील महासागर, समुद्र, नद्या-नाले, ओढे, पर्वत इतकेच काय, जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टदेखील मानवनिर्मित कचर्‍यामुळे आच्छादित झालेले दिसते. इतकेच काय तर पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर अंतराळातही असाच कचरा तरंगतोय.


आज भारतासह जगभरातील राष्ट्रांना कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे
. जगातील महासागर, समुद्र, नद्या-नाले, ओढे, पर्वत इतकेच काय, जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्टदेखील मानवनिर्मित कचर्‍यामुळे आच्छादित झालेले दिसते. इतकेच काय तर पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर अंतराळातही असाच कचरा तरंगतोय.



हा कचरारूपी भस्मासूर जेव्हा मानवालाच गिळंकृत करू लागला
, तेव्हा या कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याकरिता मानवाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. ‘देर आए दुरुस्त आए’ अशीच आपली गत. नुकतेच नाशिकमध्ये जर्मनीतील कचरा व्यवस्थापन व भारतातील कचरा व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जर्मनीच्या आयुक्त स्कुडलानी उर्फ मादाम कटया् यांनी अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला.



भारतात आज कचर्‍याची समस्या जरी मोठ्या प्रमाणात जाणवत असली तरी
, भारत योग्य मार्गाने कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने आपली पावले टाकत आहे, हे देखील आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. मुळात भारतात कचरा समस्या निर्माण होणे, हेदेखील स्वाभाविक आहे. कारण, प्रचंड लोकसंख्येच्या खंडप्राय भागात वसलेला देश म्हणजे भारत असे भारताचे वर्णन केले तर ते चुकीचे ठरणार नाही. त्यातच भारतात अनेक धर्मीयांची तीर्थस्थाने अस्तित्वात आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी होणारी गर्दी, तेथे केला जाणारा पूजा विधी यामुळेदेखील भारतात कचरानिर्मिती होणे, हे स्वाभाविक आहे. मात्र, जर्मनीत आणि नाशिकमध्ये जे कचरा व्यवस्थापन तंत्र वापरले जाते आणि राबविले जाते, त्यात जवळपास ८० टक्के साम्य आहे, असे कटया् यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे भारतातील नाशिकसारख्या शहरांना आता केवळ २० टक्केच पुढचे पाऊल टाकण्याची गरज आहे. आज कचरा व्यवस्थापन व कचर्‍यापासून ऊर्जानिर्मिती या क्षेत्रात जर्मनी जगात क्रमांक एकच्या स्थितीत आहे. त्यामुळे या २० टक्क्यांचा प्रवास हा निश्चितच आपले महत्त्व अधोरेखित करणारा आहे.



जर्मनीत ३२५ ते ३३० मेट्रिक टन कचरा दैनंदिन स्वरूपात निर्माण होतो
. पॅकेजिंग उद्योगात ३ मेट्रिक टन प्लास्टिकचा वापर होत असून त्यातील ४८.८ टक्के प्लास्टिक हे पुनर्वापरात येत असते. तसेच जर्मनीत २०२० मध्ये सर्व सेंद्रिय कचर्‍याचा वापर हा ऊर्जा निर्मितीत करण्याचे ध्येय बाळगण्यात आले आहे. जर्मनीत प्रत्येक कॉलनीतून चार टन कचर्‍याचे विलीनीकरण करण्यात येत असते. त्यात कागद, काच, प्लास्टिक आणि घरगुती सेंद्रिय कचरा यांची वर्गवारी करण्यात येते. कचर्‍याचा पुनर्वापर करण्यात जर्मनी जगात आघाडीवर असून त्यानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड या देशांचा क्रमांक लागतो, असेही कटया् यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच जर्मनीत सन १९००पासून कचरा व्यवस्थापनासंबंधी विविध कायदे व बंधने लागू करण्यात आली असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. जर्मनीप्रमाणेच भारताच्या अनेकविध शहरांत पर्यावरण संवर्धन व कचरानिर्मिती यात एक पुसटशी रेघ असून कचरा हा ऊर्जानिर्मितीचा प्रमुख स्रोत ठरू शकतो, यावर आधारित कार्यपद्धती अमलात आणली जाते.



मात्र
, स्वच्छतेची मुळात असलेली सवय आणि अपुरे मनुष्यबळ, या दोनच बाबी भारताला आणि नाशिकसारख्या शहराला कचरा व्यवस्थापन क्षेत्रात आघाडी घेण्यास रोखत आहे, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. साकल्याने विचार केला तर जर्मनीच्या आयुक्तांचे हे वाक्य खरेच आहे. आज भारत सरकार ‘स्वच्छ भारत अभियानराबवत स्वच्छतेची मूलतत्त्वे रुजविण्याचे आणि त्याचे पालन करण्याची सवय अंगी बाणविण्याचे कार्य करत आहे. स्वच्छता कर्मचारी हेदेखील सन्मानास पात्र आहेत, हे आपल्या पंतप्रधानांनी अनेकदा आपल्या कृतीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे याही क्षेत्रात भारताला पुढे नेण्यासाठी भारतवासीयांनी स्वत:च स्वच्छता कर्मचारी बनत स्वच्छतेचा वसा घेतल्यास नक्कीच मनुष्यबळाची कमतरता भरून येण्यास मदत होईल. केवळ स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छ सर्वेक्षण यांसारखे निमित्तच स्वच्छतेचे कारण बनू नये, याची खबरदारी आपण सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.

@@AUTHORINFO_V1@@