अखेर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |



सातारा : राष्ट्रवादीची साथ सोडून कमळ हातात घेणाऱ्या साताऱ्याच्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्यावर साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रश्न मात्र तसाच राहिला होता. अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीबरोबरच घेण्याचे जाहीर केले आहे.

 

निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर साताऱ्यातील निवडणूकीची कार्यक्रमपत्रीका जाहीर केली आहे. यानुसार, २७ नोव्हेंबरला राजपत्रित अधिसूचना निघणार असून, ४ ऑक्टोबरला नामांकन पत्र भरण्याचा दिवस आहे. तर ५ ऑक्टोबरला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख ७ ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच २१ ऑक्टोबरला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी आणि २७ ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@