धक्कादायक! साताऱ्यात आढळले एकाच कुटूंबातील चौघांचे मृतदेह!

    21-Jul-2023
Total Views |

satara death case 
 
 
सातारा : पाटण तालुक्यातील संनवुर गावात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस आजूबाजूला चौकशी करत आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत तपास केला जात आहे.
 
सकाळी घरात काहीच हालचाली होत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. घरात आनंदा जाधव वय 65, पत्नी सुनंदा जाधव 60, मुलगा संतोष आनंद जाधव 35, त्यांची विवाहित मुलगी पुष्पलता दस अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. या चौघांनी आत्महत्या केली ही घातपात आहे याबाबत विविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, शवविच्छेदनानंतर या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे याबाबत माहिती समोर येईल.