कंगनाचा 'धाकड' मधील पहिला लूक टीजर प्रदर्शित

    09-Aug-2019
Total Views | 29



येत्या काळात बऱ्याच ऍक्शन फिल्म्स बॉलिवूडमध्ये येऊ घातल्या आहेत. त्यापैकी एक बहुचर्चित चित्रपट म्हणजे कंगना राणावत मुख्य भूमिकेत असलेला
'धाकड' हा चित्रपट. आज या चित्रपटामधील कंगनाची लूक चा पहिला वाहिला टीजर प्रदर्शित झाला. या टीजरमधून तिचा डॅशिंग अंदाज झळकत असून तिच्या चेहऱ्यावरच्या निडर भावांनी शत्रूचा थरकाप होईल असे वाटते. 

धाकड या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घाई यांनी केले असून चित्रपटाची कथा चिंतन गांधी, रीनीशी रवींद्र आणि स्वतः रजनीश घाई यांनी लिहिली आहे तर त्यांनीच रितेश शाह यांच्या समवेत पटकथा लिहिली आहे. आजच्या टीजरमुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होईल हे निश्चित.

 

दरम्यान नुकताच कंगनाची जजमेंटल है क्या हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अनेक वाद आणि चर्चेनंतर चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळवता आला आहे. आता 'धाकड' हा चित्रपट २०२० मध्ये दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121