'फिट इंडिया' अभियानाचे शानदार उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Aug-2019
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय खेळ दिनानिमित्त 'फिट इंडिया' अभियानाची शानदार सुरवात केली. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त देशात आज देशात 'खेळ दिन' साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, " 'फिट इंडिया' या अभियानाच्या माध्यमातून आपण निरोगी आरोग्याच्या दिशेने पाऊल टाकत आहोत. निरोगी राहणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून त्यासाठी व्यायामाची गरज असते. आज तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे आपले शारीरिक श्रम कमी झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या निरोगी आरोग्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे अभियान सुरू करण्यात आले आहे."




पंतप्रधान म्हणतात
,"खेळाचे थेट नाते 'फिटनेस'शी आहे. 'फिटनेस' हा केवळ एक शब्द नसून आरोग्यपूर्ण जीवनाची अटही आहे. खेळाडूंना मिळालेला पुरस्कार हा नव्या भारताचा आत्मविश्वास आहे. यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळते. देशाचे खेळाडू हे देशाची शान आहेत." या मोहिमेअंतर्गत प्रत्येक महाविद्यालय व विद्यापीठाला १५ दिवसांचा 'फिटनेस प्लॅन' तयार करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त त्यांना ही योजना त्याच्या पोर्टलवर किंवा वेबसाइटवर अपलोड करावी लागेल. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे देशातील लोकांना आरोग्याबद्दल जागरूक करणे आहे. सरकार स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर ही मोहीम राबवू इच्छित आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, कॉर्पोरेट्सनी आणि मान्यवरांनी मदत केली. या मोहिमेला सोशल मीडियावरदेखील चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारची अनेक मंत्रालये एकत्रित काम करतील.

 








केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट केले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या 'फिट इंडिया' चळवळीत सहभागी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांकडून प्रचंड पाठबळ येत आहे". शिल्पा शेट्टी, मेरी कॉम यांनी व्हिडीओ शेअर करत या अभियानात आपला सहभाग दर्शविला. या कार्यक्रमासाठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, क्रीडाक्षेत्रातील खेळाडू व दिग्गज मान्यवर उपस्थित होते.  
@@AUTHORINFO_V1@@