एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी कडक कायदे करावे : रामदास कदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2019
Total Views |

 

मुंबई : अवैधरित्या होणाऱ्या एलईडी मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी केरळच्या धर्तीवर राज्याचा मासेमारी नियमन कायदा सुधारित करण्यात यावा. तसेच अशा पद्धतीने मासेमारी करणारे जहाज जप्त करण्याची तरतूद करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणाऱ्या मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनांच्या चर्चेसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
 

पारंपरिक मच्छीमारांचे हित जोपासण्याला राज्य सरकारचे प्राधान्य आहे, असे सांगून कदम म्हणाले, "एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणारी मासेमारी मत्स्यसाठ्यावर विपरीत परिणाम करणारी आहे. त्यामुळे यास प्रतिबंध करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात यावीत." यावेळी जानकर म्हणाले, "महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी पाहता आचारसंहितेपूर्वी अधिसूचना काढण्याचा पर्याय अवलंबण्यात यावा." या बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@