पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिलच्या स्मृतींना दिला उजाळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2019
Total Views |


  

 
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली...

 

नवी दिल्ली : कारगिलमध्ये 'ऑपरेशन विजय'ला आज २६ जुलैला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. या युद्धात पाचशेहून अधिक भारतीय जवान शहीद झाले. या शहिदांना पंतप्रधान, तिन्ही दलाचे प्रमुख, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी काश्मीरमधील द्रास येथे श्रद्धांजली वाहिली.
 
  
 
कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विट करत आपल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ट्विटमध्ये मोदींनी म्हटले की, “युद्धादरम्यान मला कारगिलमध्ये जाऊन शूरवीर जवानांसोबत मजबुती दाखवण्याची संधी मिळाली होती. तेव्ही आपल्या पक्षासाठी मी जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये काम करत होतो. करगिलमध्ये जाणे आणि तेथील जवानांना भेटणे अविस्मरणीय आहे.
 
 
 
 आणखी एका ट्विटमध्ये व्हिडीओदेखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मोदी म्हणाले की, “कारगिल विजय दिनी भारतमातेच्या सर्व वीरपुत्रांना हृदयपूर्वक वंदन करतो. हा दिवस आपल्या जवानांच्या साहस, शौर्य आणि समर्पणाची आठवण देतो. पराक्रमी योद्ध्यांना विनम्र श्रद्धांजली, त्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले. जय हिंद!
 
 
 
 
 
 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील श्रीनगर येथील बदामी बाग छावणीत २० वा कारगिल विजय दिवस साजरा केला. ते शहिदांच्या द्रास स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जाणार होते. मात्र, हवामानात झालेल्या बदलांमुळे त्यांना द्रास स्मारक येथे जाता आले नाही.
 
 
 
 
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहिदांना आदरांजली वाहिली.
 
 
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat 
 
@@AUTHORINFO_V1@@