दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रभासच्या 'साहो' या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. परंतु या चित्रपटातील एक महत्वाचा भाग असलेल्या शंकर एहसान आणि लॉय या त्रिकुटाने मात्र चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनातून बाहेर पडल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे आता या बातमीने प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली तर त्यात नवल वाटू नये कारण शंकर एहसान लॉय यांनी आत्तापर्यंत संगीत क्षेत्राला आपल्या कलाविष्कारांनी भारावून टाकले आहे.
We wish to inform all our fans that Shankar Ehsaan Loy have opted out of composing the music for #Saaho here’s wishing #Prabhas @Sujeetsign #Vamsi #Pramod #Shyam all the luck for the film :)
— Shankar Ehsaan Loy (@ShankarEhsanLoy) May 27, 2019
चित्रपटकर्त्यांनी अशी इच्छा होती की चित्रपटात त्या तिघांव्यतिरिक्त आणखी वेगळ्या संगीतकारांना देखील दिग्दर्शनाची संधी द्यावी आणि या निर्णयाशी सहमत नसल्याने त्यांनी असे केल्याची चर्चा सध्या रंगात आहे. या त्रिकुटाने केलेली गाणी चित्रपट वापरण्यात येणार असून बॅकग्राउंड स्कोअरसाठी आता दिग्दर्शक सुजीथ आता नवीन संगीत दिग्दर्शकाच्या शोधात आहेत.
साहो या चित्रपटाबद्दल आधीपासूनच बरीच चर्चा सुरु होती मात्र आता या नवीन घटनेमुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सहा या चित्रपटात बडी स्टारकास्ट झळकणार असून यामध्ये श्रद्धा कपूर, निल नितीन मुकेश, महेश मांजरेकर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, अरुण विजय आणि मुरली शर्मा यांचा समावेश आहे. हा चित्रपट या वर्षी १५ ऑगस्टला देशभर प्रदर्शित होणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat