काँग्रेस नेता डीके शिवकुमार यांनी स्वीकारला पराभव

    09-Dec-2019
Total Views | 314


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : कर्नाटकमधील १५ विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सोमवारी सकाळी सुरु झाली. सुरुवातीपासूनच भाजप पक्ष आघाडीवर होता. सकाळी ११ पर्यंत आलेल्या निकालाप्रमाणे, भाजपने १० जागांवर आघाडी घेतली होती तर एका जागेवर भाजपने विजया मिळवला होता. तसेच काँग्रेस पक्ष फक्त २ जागांवर आघाडीवर होते. तसेच, जनता दल एका जागेवर आघाडीवर होती.

 

पुन्हा सत्ता राखण्यासाठी येडीयुरप्पा सरकारला बहुमतासाठी केवळ सहाच जागा आवश्यक होत्या. त्यामुळे निकालांच्या कलांनुसार या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. "या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाही. " अशी भावना काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केली.

 

जेडीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना काँग्रेस आणि जेडीएसमधील १७ आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यांच्या बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले होते. नंतर कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केले. २२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ १७ आमदारांच्या बडतर्फीनंतर २०८ वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे १०५ आमदार असून, सत्तेवर राहण्यासाठी त्यांना ६ आमदारांचे संख्याबळ आवश्यक होते.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121