मुंबई (हर्षदा सीमा) : सोशल मिडीयावर एखादा व्हिडीओ ट्रेंड झाला की त्याचे मिम्स बनायला सुरुवात होते. सध्या अशाच एका व्हिडीओने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे. एका वाहिनीवर सुरु असलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ... मुलाखत घेणारा आणि ती देणारा या दोघांमधल्या विनोदी संभाषणामुळे या दोन्ही व्यक्तिरेखा सध्या चर्चेत आल्या आहेत.
नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?
पाकिस्तानचा लोकप्रिय कार्यक्रम ‘लूज टॉक’ यातील एका एपिसोडचा हा भाग... हार्मोनीअम वाजवणाऱ्या कलाकाराची मुलाखत घेणारा मुलखातकार त्याला काही प्रश्न विचारतो. त्यावर कलाकार त्याला सांगतो की आपल्याला हार्मोनीअम वाजवता येतच नाही. अब्बा म्हणजेच वडील हार्मोनीअम सोडून गेल्यामुळे मी हार्मोनीअम वाजवतो असं सोपं त्याचं उत्तर. मात्र या संवादा दरम्यान त्यांचं सतत हार्मोनीअम वाजवणं आणि चिडून बोलण अतिशय गमतीदार वाटतं. चिडल्यानंतरही ते ‘माफ करना, गलती से इधर उधर निकल जाता है’, असं म्हणून माफी मागणं यामुळे हा व्हिडीओ चर्चेत सध्या आला आहे.
कोण आहेत हार्मोनीअम चाचा?
हार्मोनीअम चाचाची भूमिका करणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे मोईन अख्तर. मोईन यांचं कुटुंब भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उत्तरप्रदेशमधून पाकिस्तानात गेलं. बालपणापासून अभिनयाचं वेड असणारा हा कलाकार वयाच्या १६ व्या वर्षी प्रसिध्द ‘स्टँडअप कॉमेडीयन’ झाला. हॉलीवूड चित्रपटावर आधारित ‘रोझी’ या पाकिस्तानी मालिकेत त्यांनी ‘रोझी’ हे स्त्री पात्र साकारलं. नुसतेच विनोद नव्हे तर समाजातील वाईट गोष्टींवर विनोदी चपराक मारणं या कलाकाराला चांगलच जमलेलं. मोईन अख्तर हे पाकिस्तानचे लोकप्रिय विनोदवीर होते. मोईन अख्तर आणि अन्वर मकसूद यांनी मिळून ‘लूज टॉक’ हा विनोदी कार्यक्रम सुरु केला होता. या कार्यक्रमचे ३०० भाग चित्रित झाले. २०११ साली या विनोदवीराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.
abba harmonium bajate the.. new version. pic.twitter.com/1B7I1ibiSX
— Photography Passion (@PhotographyPas7) December 1, 2019
*Abba Harmonium Khaate The*
— @unpaired_electron (@NawabSaheb7) November 28, 2019
.
Le pic.twitter.com/aOt1NaJkLU