भारताच्या चीफ ऑफ डिफेन्सपदी बिपीन रावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |


dsg_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते ३१ डिसेंबरला लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होणार आहेत. केंद्र सरकारने रविवारीच सीडीएस हुद्द्यासाठी वयोमर्यादा वाढवली होती. केंद्रीय सुरक्षा समितीने मागच्या मंगळवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पदाला मंजुरी दिली. सीडीएसचे पद हे तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांपेक्षावरील हुद्याचे असणार आहे. सीडीएस फोर स्टार जनरल अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती.

 

संरक्षण मंत्रालयाने लष्करी सेवा व नियम कायद्यात सुधारणा केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने २८ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेत सीडीएस प्रमुख ६५ वर्षांपर्यंत सेवेत राहू शकतात असे नमूद केले आहे. केंद्र सरकारला आवश्यकता वाटल्यास सीडीएस प्रमुखांना मुदतवाढ देण्यात येऊ शकते. जनरल बिपीन रावत लष्करप्रमुख पदावरून मंगळवारी, ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. सध्याच्या नियमांनुसार, तिन्ही दलांचे प्रमुख वय ६२ वर्ष अथवा ३ वर्षांपर्यंत कार्यरत राहू शकतात.

@@AUTHORINFO_V1@@