बॉलीवूडमध्ये अजून एका ‘बायोपिक’ची भर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |

malala_1  H x W



बॉलीवूडमध्ये सध्या ‘बायोपिक’ची हवा सुरु आहे. या बायोपिकच्या यादीत आता अजून एका व्यक्तीची भर पडणार आहे. संयुक्त राष्ट्राने या दशकातील सर्वात प्रसिध्द टीनएजर म्हणून घोषित केलेल्या आणि शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्या पाकिस्तानच्या मलाला युसुफझाई हिच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री रिम शेख मलालाची भूमिका साकारणार आहे.


या चित्रपटात रिमसह दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. जयंतीलाल गाढा यांच्या पेन व टेक्नो फिल्म्स तर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एच ए अमजदखान करणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षांत म्हणजेच ३१ जानेवारी प्रदर्शित होणार आहे. 





मलाला हिला लहानपणापासून मुलींच्या शिक्षणाबाबत आस्था होती आणि बीबीसीवर ती गुल मकई या नावाने उर्दू ब्लॉग लिहीत असे. तिच्यावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे नाव गुल मकई असेच आहे. तालिबानी राजवटीला या ब्लॉगच्या माध्यमातून विरोध केल्यामुळे तिच्यावर ती शाळेत जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबाने ब्रिटन मध्ये आश्रय घेतला आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@