चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी ‘मोस्ट स्टायलिश' पुरस्काराने सन्मानित

    20-Dec-2019
Total Views | 53

swapnil_1  H x



अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करून चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा 'मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्यात सन्मान करण्यात आला. चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा झेंडा फडकवणाऱ्या स्वप्नीलचा प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी ' मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' या सोहळ्यात आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू रिजनल सिनेमा बेस्ट अॅक्टर अवॉर्डहा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


या पुरस्काराबद्दल स्वप्नील जोशी म्हणाला की, ‘आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रिब्यूशन टू रिजनल सिनेमा बेस्ट अॅक्टरचा अवार्ड आज मला मिळाला, या पुरस्कार सोहळ्यात मला दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून पहिल्या वर्षी मला ‘यंग अचिवर्स’ म्हणून तर यावर्षी प्रादेशिक चित्रपटांमधील योगदानासाठी 'मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' मिळाला. हा 'मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' मिळाला याचा मला खूप आनंद आणि आभिमानही वाटतो. यापुढे ही मी मायबाप रसिक प्रेक्षकांचे असेच मनोरंजन करत राहीन.


याशिवाय २३ डिसेंबरपासून रेडिओवर
रेडिओ शो शेअरिट टू स्वप्नीलहा कार्यक्रम घेऊन स्वप्नील एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121