भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर ; हा खेळाडूचा ठरणार धोकादायक?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारत दौऱ्यातील एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली. कसोटीत दमदार कामगिरी करणारा मार्नस लाबुशेनला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली असून उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मार्कस स्टॉयनिस, नॅथन लिऑन, नॅथन कोल्टर-नील आणि ग्लेन मॅक्सवेल यांना संघातून वगळण्यात आले आहे.

 

ऑस्ट्रेलियाचा संघ २०२०मध्ये एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया बोर्डाने १४ सदस्यीय खेळाडूंचा संघ घोषित केला. यामध्ये लाबुशेनशिवाय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून अ‌ॅलेक्स कॅरीला संधी मिळाली आहे. पण, जेसन बेहरेनडॉर्फला दुखापतीमुळे या मालिकेतून वगळण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची धुरा डेव्हिड वार्नर, अ‌ॅरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि अ‌ॅलेक्स कॅरीवर असणार आहे. तसेच, गोलंदाजीची धुरा मिचेल स्टार्क, सीन अ‌ॅबोट, केन रिचर्डसन, जोश हेझलवूड, अ‌ॅडम झम्पा आणि अ‌ॅश्टोन टर्नर सांभाळतील.

 

ऑस्ट्रेलियाचा संघ

 

अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), सीन अ‍ॅबोट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

 

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

 

१४ जानेवारी - मुंबई

१७ जानेवारी - राजकोट

१९ जानेवारी - बंगळुरू

@@AUTHORINFO_V1@@