आसाम आंदोलनाचा क्रिकेटला फटका... हॉटेलमध्येच अडकले क्रिकेटपटू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेमध्ये लोकसभा विधेयक मंजूर झाले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर लागू करण्यात आले. यावरून आसाममध्ये जोरदार निर्दशने चालू आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला सध्या हिंसक वळण लागले आहे. सध्या अस्समध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

 
 

या आंदोलनाचा क्रिकेटवर देखील परिणाम झाला आहे. नागरिकांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे गुवाहाटीत सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील आसाम विरुद्ध सर्व्हिसेस हा सामना अखेरच्या दिवशी थांबवण्यात आला. हा सामना खेळण्यासाठी आसाममध्ये गेलेला संघ हॉटेलमध्ये अडकला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सामन्यातील अखेरच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. हा सामना खेळण्यासाठी गेलेला सर्व्हिसेसचा संघ मात्र एका हॉटेलमध्ये अडकला. या संघाला शहरातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.

@@AUTHORINFO_V1@@