सेन्सेक्सचे सिमोल्लंघन सुरूच : निर्देशांकाची नव्या विक्रमाला गवसणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : मुंबई शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सेन्सेक्सने ४० हजार ४८३.२१ इतका उच्चांक गाठला. यापूर्वी हा सर्वाधिक विक्रमाचा आकडा ४० हजार ३२९.२२ इतका होता. शेअर बाजारात दिवाळीनंतर सलग सातव्या सत्रात तेजी दिसून येत आहे. दिवाळीनंतर शेअर बाजार एकदाही घसरण दिसली नाही. सोमवारी सेन्सेक्स १३६.९३ अंशांनी वधारत ४० हजार ३०१.९६ इतक्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी अद्याप आपल्या विक्रमापासून दूर आहे. निफ्टी सोमवारी ५०.७० अंशांनी वधारत ११ हजार ९४१.३० इतक्या स्तरावर बंद झाला.

 

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वधारलेल्या स्तरापैकी इन्फोसिस हा ३.२० टक्क्यांनी वधारला. वेदांता, एचडीएफसी, टाटा स्टील आणि ओएनजीसी आदी शेअर सर्वाधिक उमटले. हीरो मोटोकॉर्प, इंडसइंड बॅंक, टाटा मोटार आदी शेअर घसरले. वाहन उद्योग क्षेत्रातील १.२९ टक्के घसरण झाली. बीएसई मिडकॅप ०.१ टक्के आणि स्मॉलकॅपमध्ये ०.२२ टक्के तेजी दिसून आली.



@@AUTHORINFO_V1@@