मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून १० हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसे आदेश ही प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर जाहीर केले.
दरम्यान काल झालेल्या बैठकीत अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना यांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेतला. "राज्यातील शेतकऱ्यांचे नेमके किती नुकसान झाले, याबाबतची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने कोणत्या पिकाला किती नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज निर्णय घेण्यात आला नाही. मात्र येत्या २ ते ३ दिवसांमध्ये नुकसान भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेऊन मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल" ,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Cabinet SubCommittee approved a special provision of ₹10,000 crore to assist & give relief to farmers suffering due to unseasonal rains. Cabinet SubCommittee asked officials to finalise details taking ground report & information, apart from the assistance by insurance companies.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 2, 2019