पी.व्ही. सिंधूची हाँगकाँग ओपन बॅडमिंटनच्या दुसर्‍या फेरीत झेप

    13-Nov-2019
Total Views | 29


हॉंगकॉंग येथे सुरु असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पी.व्ही. सिंधूने दुसऱ्या फेरीत झेप घेतली आहे. सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या पी. व्ही सिंधूने पुन्हा एकदा जगाला आपल्या उत्कृष्ट खेळाचे दर्शन आज झालेल्या सामन्यातून दिले. सध्या जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हीच सामन्यादरम्यान ३६ व्या मिनिटालाच धुव्वा उडवत सिंधूने हा सामना स्वतःच्या नावावर करून घेतला.

आगामी सामन्यात पी.व्ही. सिंधू आणि थायलंडच्या बुसनान ओंगबारुंगफान आमने सामने येणार आहेत. आज झालेल्या सामन्यातील पी. व्ही सिंधूची चांगली कामगिरी बघून प्रेक्षकांना आता या आगामी सामन्याविषयी उत्सुकता आहे. दरम्यान भारतीय महिला खेळाडूंमध्ये सायना नेहवाल नवव्या स्थानावर कायम आहे.

जागतिक बॅडमिंटन परिषदेने जारी केलेल्या मानांकनात भारताच्या साई प्रणितने दहावे स्थान पटकावले आहे. किदंबी श्रीकांत तेराव्या, तर समीर वर्मा सोळाव्या स्थानावर आला असून, जपानच्या केंटो मोमोटा याने पहिले स्थान कायम राखले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121