आरे बचावचे नेते पसार ; भाबड्या पर्यावरणप्रेमींना तुरुंगवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2019
Total Views |


 


मुंबई : आरे वृक्षतोडीविरोधात गोंधळ घालणाऱ्या २९ जणांना तुरुंवास भोगावा लागलेला असताना 'आरे बचाव'चे म्होरके म्हणविणारे काही पर्यावरणवादी मात्र आपल्या घरात सुखाच श्वास घेत आहेत. यातील काही पर्यावरणवाद्यांनी शुक्रवारी कारशेडच्या ठिकाणी मध्यरात्री झालेल्या गोंधळापासून दूरच राहणे पसंत केले. काहींनी मुंबई बाहेर असल्याचे कारण पुढे केले. एकूणच काय 'भाबड्या' पर्यावरणप्रेमींना 'आरे बचाव'ची खोटी भूल देऊन त्यांना संकटात टाकल्यानंतर 'आरे'ला 'का रे?' करणारे पर्यावरणवादी नेते आपल्या घरात सुरक्षित आहेत.

 

'मेट्रो- ३' कारशेडसाठी शुक्रवारी सायंकाळी झाडे कापण्यास सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याठिकाणी जाऊन गोंधळ घातला. पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे पोलिसांनी यातील २९ जणांना अटक केली. मात्र, या २९ जणांमध्ये 'आरे बचाव'चा नारा देणारे एकही पर्यावरणवादी नाही. मुळात  झालेल्या गोंधळापासून दूर राहिले तर काहीजण त्याठिकाणी गेले. पण गोंधळ सुरू झाल्यानंतर तेथून पसार झाले. तसेच, त्यातील एकजण गोरेगाव चेक नाका, मरोळ नाक्यावरूनच आंदोलनाचे नेतृत्व केल्यासारखे भासवत आहे. यातूनच पर्यावरणवाद्यांची 'तू मारल्यासारख कर मी लागल्यासारखं करतो' ही वृत्ती लक्षात येते. भाबड्या पर्यावरणप्रेमींना यामध्ये राहिले तर इतर बोगस पर्यावरणप्रेमी नेत्यांनी तिथून पळ काढला. या प्रकारानंतर पळ काढलेले हेच बोगस पर्यावरणप्रेमी समाज माध्यमांवरून स्वतःच्या जबाबदारीवर आंदोलन करा असा संदेश पसरवण्याचे काम करत आहेत.

 

मुंबई उच्च न्यायालयाने आरे संदर्भातील सर्व याचिका शुक्रवारी फेटाळून लावल्या. त्यानंतर 'मेट्रो-३' प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी आरेमधील कारशेडसाठी आवश्यक असणारी झाडे तोडण्यास सुरुवात केली. मात्र, या कामाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला. शुक्रवारी मध्यरात्री मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी लोक याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना न जुमानता नियोजित कारशेडच्या ठिकाणी शिरकाव केला. विनापरवाना बेकायदेशीररित्या जमलेल्या १०० ते २०० लोकांनी पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच त्यामधील काही लोकांनी पोलीस शिपाई इंगळे यांना हाताने मारहाण करून त्यांना दुखापत होण्यास कारणीभूत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणी पोलिसांनी २९ जणांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये २३ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी त्यांना बोरिवलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी या सर्व २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामधील पुरुष आरोपींना ठाणे तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@