नव्या विक्रमाच्या दिशेने 'सेन्सेक्स'ची झेप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2019
Total Views |


मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आता नव्या विक्रमाकडे झेपावत आहे, बुधवारी बाजाराने आत्तापर्यंतचा सर्वाधिक विक्रमाजवळ पोहोचण्यासाठी केवळ २१५.७५ अंश मागे राहिला. सेन्सेक्सने दुपारी पावणे दोन वाजता सर्वाधिक उसळी घेत ४० हजार १६५ इतक्या अंशांवर पोहोचला. दिवसअखेर तो मुहूर्त ट्रेडिंगच्या तुलनेत २२० अंशांनी वधारत ४० हजार ५१.८७ च्या स्तरावर बंद झाला.

 

३ जून २०१९ रोजी तो ४० हजार २६७.६२ अंशांवर बंद झाला होता. दुसऱ्या दिवशी ४० हजार ३१२.०७ इतकी विक्रमी झेप निर्देशांकाने घेतली होती. पुढील काही दिवसांत हा विक्रम मोडीत काढेल, असा अंदाज व्यक्त करण्यता येत आहे. तिमाही निकाल आणि केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७.२५ अंशांनी वधारत ११ हजार ८४४.१० वर बंद झाला. गेल्या चार सत्रात सेन्सेक्स एकूण १ हजार ३१.४८ अंशांवर मजबूत झाला आहे. मुंबई शेअर बाजारात आयटी क्षेत्रात सर्वाधिक १.४७ टक्के तेजी नोंदवण्यात आली आहे.

 

कर सुधारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण

लॉंग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी), सिक्युरीटी ट्रान्झेक्शन टॅक्स आदी करांमध्ये केंद्र सरकारकडून सवलत जाहीर झाल्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे. तिमाही निकाल, ब्रेग्झिटसाठी वाढवून मिळालेली वेळ, अमेरिका-चीन व्यापार युद्धाबद्दल बैठक, भारतातील सणासुदीच्या दिवासांमुळे वाहन उद्योगातील विक्री याचा एकात्मिक सकारात्मक परिणाम बाजारावर झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@