अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा भारतीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2019
Total Views |



रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चालू असलेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने टॉस जिंकत खराब सुरुवात केली. पण, रोहित आणि राहणेच्या सय्यमी खेळीमुळे भारताने २००चा आकडा पार केला. यावेळी आलेल्या पावसाने भारताचा आजचा खेळ रद्द करण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवला तेव्हा रोहित नाबाद ११७ धावा तर रहाणेने नाबाद ८३ धावांवर खेळत होता. या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सलग तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये शतक झळकावून रोहित शर्माने अनेक विक्रम रचले.

 

- रोहित शर्मा एका कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा जास्त शतकी खेळी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी माजी फलंदाज सुनिल गावसकर यांनी अशी कामगिरी केली होती.

 

- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक ३ वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये त्यानं गौतम गंभीर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली.

 

- आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत रोहितने सर्वाधिक षटकार लागवण्याचा मान मिळवला आहे. रोहितने ४ डावांमध्ये १४ षटकार लगावत पहिल्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर इंग्लडच्या बेन स्टोक्सने १० डावांत १३ षटकार लागले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@