अयोध्येत कलम १४४ लागू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2019
Total Views |
 
 

राम मंदिर सुनावणीचा निर्णायक टप्पा आजपासून


नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जागेवरील मालकी हक्काच्या वादावर मागील सलग ३७ दिवसांपासून सुरू असलेली सुनावणी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. सोमवापासून या सुनावणीचा निर्णायक टप्पा सुरू होणार आहे. दरम्यान, अयोद्ध्या आणि परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

 

नवमी आणि दसरा या प्रमुख सणांमुळे या आठवड्यात अयोध्येवर सुनावणी होऊ शकली नव्हती. आज या सुनावणीचा ३८ वा दिवस राहणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे ६ ऑगस्टपासून या प्रकरणी नियमित सुनावणी सुरू झाली होती. न्यायालयाने सुनावणी पूर्ण करण्यासाठी १७ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे.

 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये चार याचिकांवर सुनावणी करताना, रामजन्मभूमी-बाबरी मशिदीची २.७७ एकर जागा, या खटल्याशी संबंधित तीन पक्षकार सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि रामलल्ला यांच्यात समान विभाजित करण्यात यावी, असा ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालाला आव्हान देणार्‍या सुमारे १४ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या आहेत.

 

गेल्या अनेक दशकांपासून हा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने, तो आता फार काळ प्रलंबित राहायला नको, यासाठी न्यायालयाने तीन सदस्यीय मध्यस्थ समिती गठित केली होती, पण या समितीला पाहिजे तसे यश न आल्याने, न्यायालयाने आठवड्यातून किमान पाच दिवस सलग सुनावणी करण्याचे ठरविले. त्यानंतर सुनावणीसाठी एक तास वाढविण्याचा महत्त्वाचा निर्णयही घेण्यात आला. १७ ऑक्टोबर हा सुनावणीचा शेवटचा दिवस असल्याने आणि दोन्ही पक्षकारांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने, सोमवारपासून सुरू होणारा आठवडा निर्णायक सुनावणीचा राहणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@