टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे सुपर टायफून हगिबिस वादळामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. या वादळामुळे आत्तापर्यंत १४ जण ठार तर १६ जण जखमी झाले आहेत. तर १७ जण बेपत्ता आहेत. जपानी सरकारने आतापर्यंत एक लाख लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. जपानी मेटेरोलॉजिकल एजन्सीने (जेएमए) म्हटले आहे की,"शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) हागीबिस वादळाचा तडाखा बसला. तसेच जेएमए ने इबाराकी, तोचिगी, फुकुशिमा, मियागी आणि निगाता प्रदेशात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, अशी माहिती सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या वादळाच्या आदल्या दिवशी जपानमध्येही ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचे केंद्रबिंदू चिबा-केन प्रदेशात ८० किलोमीटर खोलवर नोंदले गेले होते. क्योडो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील अनेक नद्या ओसंडून वाहात आहेत. पूर, दरड कोसळलेल्या मध्य, पूर्व आणि ईशान्य भागात बचावकार्य सुरू आहे. जपानच्या होन्शु बेटाच्या मुख्य बेटावरील तब्बल सहा लाख लोकांना तेथून बाहेर काढण्याचा सल्ला देण्यात आला.
I offer condolences on behalf of all Indians on the loss of life caused by super-typhoon #Hagibis in Japan. I wish early recovery from the damage and devastation caused by this natural calamity.
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2019
I am sure that the preparedness and resilience of the Japanese people and the leadership of my friend @AbeShinzo would be able to address the aftermath effectively and quickly. Japan’s preparedness against natural disasters is well appreciated.
— Narendra Modi (@narendramodi) October 13, 2019