मराठी माणूस होणार पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

    05-Jan-2019
Total Views | 40

 


 
 
 
 
नागपूर : 'एक मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान होईल', असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये झालेल्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते. जागतिक मराठी अकादमीतर्फे शुक्रवारी नागपूरमध्ये १६ व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ कवी आणि अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आणि आशुतोष शेवाळकर यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
 

देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस कधी दिसणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०५० पर्यंत देशाला एक नव्हे अनेक मराठी पंतप्रधान मिळतील. त्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. लवकरच मराठी माणूस पंतप्रधान म्हणून दिसेल. असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जगाच्या कानाकोपऱ्यात मराठीचा झेंडा उंचावणे, ही आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी एक नव्हे तर अधिक मराठी व्यक्ती विराजमान झालेल्या आपण निश्चित पाहू. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आरक्षणाच्या मुद्द्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आज देश संक्रमणावस्थेत आहे. येणारा काळ हाच आरक्षणाच्या विषयावर उपाय सुचवेल. संधीचा अभाव असल्याने ही परिस्थती निर्माण झाली आहे. खासगी क्षेत्रात अनेक संधी आहेत, परंतु ती मिळविण्यासाठी तसा समाज तयार करावा लागेल. असे ते म्हणाले.

 

सरकारी नोकरीत केवळ ५० टक्के आरक्षणदिले जाऊ शकते. त्यामुळे समाजातील कोणत्याही वर्गाला आरक्षण दिले तरीदेखील त्याचा फार काही उपयोग होणार नाही. त्यामुळे फक्त मनाचे समाधान होईल. असे मुख्यमंत्री म्हणाले. पुढे ५ ते १० वर्षांनी खासगी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे आरक्षणाचे महत्त्व कमी होईल. असे मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात लक्षात आणून दिले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नाही - चंद्रशेखर बावनकुळे यांचा एकनाथ खडसे यांना सल्ला

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत एकनाथ खडसेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचं टार्गेटिंग असून त्यांच्या प्रतिमेला गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे. फक्त संबंध असल्याचा अर्थ हा गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत, पण त्याचा अर्थ मी काही गैर केले असे होत नाही. माझा खडसेंना सल्ला आहे,तुम्ही सतत गिरीश महाजन यांच्यावर आरोप करता, हे योग्य नसल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121