'उरी'ची बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई

    16-Jan-2019
Total Views | 24



मुंबई : अभिनेता विकी कौशलचा 'उरी-सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित झाला. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने दमदार कमाई करत अवघ्या चार दिवसात ५० कोटीचा आकडा पार केला आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशलचे काम चित्रपटाचे खास आकर्षण बनत आहे. शिवाय, चित्रपटाची हाताळणी लोकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवशीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे. हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

 

'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून भारतीय सैन्याचे शोर्य आणि सर्जिकल स्ट्राईकचा थरार पडद्यावर उलगडण्यात आलाय. यात विकीने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाला चाहते भरभरुन दाद देत आहेत. तसेच, चित्रपटामध्ये परेश रावलचेही काम लक्षणीय आहे. तसेच, यामी गौतमी आणि मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारा मोहित रैना यांचेही काम वाहवाही मिळवत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121