पबजी खेळत होता आणि बेतले जीवावर

    11-Jan-2019
Total Views | 35
 
 

नवी दिल्ली : मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढत असून त्याचा फटका एकाला नुकताच बसला आहे. मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या पबजी या व्हिडियो गेमचे वेड असणाऱ्या एका पबजीवीराला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

जम्मू-काश्मीरध्ये सतत १० दिवस पबजी गेम खेळल्याने एका फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडले असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हा जम्मू-काश्मीरमधील फिटनेस ट्रेनर सतत १० दिवस पबजी खेळत होता. गेमचे मिशन पूर्ण झाल्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडले. तो विचित्र वागू लागला होता.

 

मिशन पूर्ण झाल्यानंतरही त्याने स्वतःला त्रास देण्यास सुरुवात केली, या सर्व प्रकारामुळे त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यामुळे व्हायरल झालेल्या या गेममुळे धडधाकट असलेल्या फिटनेस ट्रेनरचे मानसिक संतुलन बिघडल्याने कुटुंबासह स्थानिका रहिवाशांनाही धक्का बसला आहे.

 

पबजी गेमवर बंदी आणण्याची मागणी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे स्थानिकांनी केली आहे. फिटनेस ट्रेनरवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो आता नातेवाईकांना ओळखू लागला आहे, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121